वैजापूर
येथील रहिवासी वसंत रामकिसन जोरे (पाटील) यांचे बुधवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद
निधन झाले. मृत्यु समयी त्याचे वय ४५ वर्ष होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी, माजी उपनगराध्यक्ष अकिल शेख, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके, घनश्याम वाणी, लिमेश वाणी, रमेश हाडोळे, साहेबराव मापारी, माजी शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत, बापू गावडे, श्रीकांत साळुंके, दीपक साळुंके यांनी श्रद्धांजली अर्पण केली.वसंत जोरे यांच्या पश्चात्य पत्नी, मुलगा व मुलगी, आई-वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.नगर पालिकेतील बांधकाम विभागाचे शंकर जोरे (पाटील) यांचे ते बंधू होत.

Social Plugin