महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वैजापूर
शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात सालाबादप्रमाणे याही वर्षी मंगळवार (ता.३०)रोजी नवरात्र उत्सवानिमित्त चंडियाग होम विधी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात महिला भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला.
वाचिका मोनिका गंडे, सोनाली त्रिभुवन, ताराबाई वाळुंज,अनिता राजपूत,पल्लवी राजपूत, सुमनबाई आलुले यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास सहकार्य केले. मोनिका गंडे यांनी सर्व विधी पूर्ण केले. नवरात्रोत्सव निमित्त तीनशे पेक्षा अधिक महिला भाविकांनी या अष्टमी होम हवन निमित्त चंडियाग विधीत सहभाग नोंदविला. कार्यक्रमात माजी नगरसेवक लिमेश वाणी, रावसाहेब निखाडे,अरविंद तुपे, संदीप मोटे, प्रसन्न आलुले,गणेश संतपाळ,तुषार अनर्थे, कार्तिक वाणी, संकेत वाणी, अनिता वाणी, सी.के.पवार, धोंडिरामसिंह राजपूत यांनीही सहभाग नोंदविला.

Social Plugin