वैजापूर
येथील पालिकेच्या पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करीत वाचन प्रेरणा दिन निमित्त विद्यार्थ्यांनी बुधवार (ता.१५) रोजी पुस्तक वाचन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिक नीता पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत हे होते. यावेळी त्यांनी "वाचू, वाचू ,वाचू पुस्तक आपण वाचू, शिक्षणाच्या आनंदाने जगात सारे नाचू" अशी कविता सादर केली व एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन वाचनाचे जीवनातील महत्व विशद केले.
या प्रसंगी पालिका शिक्षण विभागाचे प्रमुख पर्यवेक्षक बी.बी.जाधव ,सुभाष गोमलाडू तगरे,तसेच शिक्षिका राजश्री बंड, सुवर्णा बोर्डे,लता सुखासे ,ज्योती दिवेकर, पल्लवी भाकरे, सोनवणे,वैशाली शेलार, सुनीता वसावे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpg)
.jpg)
Social Plugin