वसंत क्लबतर्फे पूरग्रस्तांना किराणा साहित्य वाटप...



वैजापूर 
शहरातील पूरग्रस्त भागातील लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी येथील वसंत क्लबतर्फे गोड करण्याचा प्रयत्न करत  ४०० कुटुंबाना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. 


अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले त्या परिवारांची दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी वसंत क्लब तर्फे पुढाकार घेत या कुटुंबियांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. या किराणा साहित्यात पाच वस्तू देण्यात आल्या. नुकसान झालेल्या ४०० कुटुंबांना प्रत्येकी एक किट वाटप करण्यात आले. तत्पूर्वी वसंत क्लबतर्फे १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला. 


याप्रसंगी वसंत क्लबचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. जी. शिंदे यांच्यासह सचिव जफरखान, डॉ संतोष गंगवाल, संचालक मेजर संचेती कय्यूम सौदागर अॅड परदेशी, भगवान सिंग राजपूत, अॅड बत्तिसे व्यवस्थापक कदम व कर्मचारी उपस्थित होते.