वैजापूर
दि.वैजापूर मर्चंटस कॉ-ऑप बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक अशोक जोशी (आण्णा) यांचे अल्पशा आजाराने बुधवार (ता.२२) रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अकरा वाजता शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आमदार रमेश पा.बोरनारे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी, मर्चंट कॉ-ऑप बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कै.अशोक जोशी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. वर्धमान बँकेतील सोनेतारण विभागातील कर्मचारी रोहित जोशी यांचे ते वडील तर सेवानिवृत्त कक्षअधिकारी नंदकुमार जोशी यांचे ते बंधू होत.

Social Plugin