ज्योत कल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने पत्रकार संघाच्या सदस्यांचा सत्कार..

संस्थेच्यावतीने समाजपयोगी उपक्रम राबविणार ; चेअरमन सारिका सूर्यवंशी

वैजापूर

शहरातील फुलेवाडी रोड परिसरात असलेल्या ज्योत कल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्यावतीने  दिपावलीनिमित्त वैजापूर मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.  



याप्रसंगी पतसंस्थेच्या चेअरमन सारिका सूर्यवंशी यांनी मागील चार वर्षांपासून ज्योत कल्याण पतसंस्था ही खातेदारांसह ठेवीदारांचा विश्वास संपादित करण्यात यशस्वी झाली असल्याचे सांगत संस्थेचा व्यावसायिक आलेख दरवर्षी उंचावत असल्याची माहिती दिली. दरम्यान पतसंस्थेच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत  शहर व परिसरात वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबविले जात असून भविष्यातही संस्थेच्यावतीने समाजपयोगी उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगितले.



याशिवाय संस्थेच्यावतीने होतकरू व्यावसायिकांना अत्यल्प दरात कर्ज वाटप करण्यात आले असून ठेवीदारांना मुदतठेवींवर आकर्षक व्याज देण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला वैजापूर मराठी पत्रकार संघाचे विजय गायकवाड, भानुदास धामणे, काकासाहेब लव्हाळे, मकरंद कुलकर्णी, मोबीन खान, बाबासाहेब धुमाळ,  फैसल पटेल, अमोल राजपूत, डॉ. हरिश साबणे, मन्सूर अली, दिपक बरकसे, नितीन थोरात, प्रवीण भडाईत (पाटील), गौरव धामणे, सुयोग वाणी यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्हाईस चेअरमन सचिन नाईकवाडी, कर्ज विभाग प्रमुख महेश आंबेकर, रोखपाल प्रगती गायकवाड, साक्षी राजपूत, गणेश मापारी व पतसंस्थेचे सुमंगल ठेव प्रतिनिधी (पिग्मी एजंट) यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपस्थितांचे आभार व्यवस्थापक निखील नाईकवाडी यांनी मानले.