वैजापूर पंचायत समिती गण आरक्षण जाहिर

इकडेही दिसला महिला राज...

वैजापूर

येथील पंचायत समिती सभागृहात १३ ऑक्टोबर रोजी वैजापूर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसिलदार सुनील सावंत यांच्या प्रमुख


उपस्थितीत आरक्षण निश्चित करण्यात आली. पंचायत समितीच्या एकूण १६ जागांसाठी ०८ माहिला व ०८ पुरुष सदस्य निवडून द्यावयाचे आहेत.


यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सोडतीनंतर तालुक्यातील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राजकीय समीकरणे जुळविण्यास सुरुवात केली आहे. पंचायत समितीचे बहुतांश जागा आरक्षित झाल्याने अनेकांचा 'हिरमोड' झाला आहे तर काहींची लॉटरी लागली आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जणांनी सोशल मिडियावर  भावी पंचायत समिती सदस्य म्हणून पोस्ट टाकून धुरळा उडवून दिला आहे.



वैजापूर पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी आरक्षित झालेल्या जागा पुढीलप्रमाणे :

वाकला  - अनुसूचित जमाती महिला (ST)
पोखरी - सर्वसाधारण महिला
सवंदगाव - अनुसूचित जाती महिला (SC)
जरूळ - सर्वसाधारण
लासूरगाव - सर्वसाधारण महिला
पालखेड - सर्वसाधारण
घायगाव - सर्वसाधारण
लाडगाव - सर्वसाधारण
महालगाव - अनुसूचित जाती (SC)
नागमठाण - नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
शिवूर -  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC)
खंडाळा - सर्वसाधारण
मनुर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
बोरसर - सर्वसाधारण महिला
वांजरगाव - सर्वसाधारण महिला
विरगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC)