रस्त्यावरील खड्यांमुळे अद्रकचा ट्रॅक्टर उलटला....

शेतकऱ्याचे मोठे नुकसान : सुदैवाने जीवितहानी टळली

वैजापूर

शिऊर ते आलापूरवाडी या प्रमाणात रस्त्यावर मोठ्या झालेल्या खड्ड्यांमुळे अद्रक घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आलापूरवाडी जवळील वाळके वस्तीजवळ उलटला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी अद्रक रस्त्याच्या बाजूच्या खड्डयांत पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


शिऊर येथील शेतकरी योगिनाथ जाधव यांनी शेतातून काढलेले अद्रक ट्रॅक्टरने घेऊन शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिऊरच्या दिशेने जात होते. मात्र, रस्त्यावर असलेल्या शिऊर-आलापूरवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून, यामुळे लहान-मोठे अपघात घडत असतात.

खड्ड्यात ट्रॅक्टरचे संतुलन बिघडल्याने वाहन पलटी झाले. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही; परंतु अद्रक रस्त्यावर विखुरली गेली आणि मालाचे नुकसान झाले.या घटनेमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रस्त्यावर पाइपलाइन टाकल्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम अपुरे राहिले. त्यामुळे पूर्ण रस्त्याची चाळणी झाली आहे. या मार्गावरून शाळकरी मुले, दैनंदिन प्रवासी, चार गावांचे दळणवळण सुरू असते. या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडतात; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांची संताप व्यक्त केला आहे.