विद्यार्थी झाले एक दिवसाचे शिक्षक..
वैजापूर
शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील बाभूळगाव (बु) येथील जयहिंद विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी.जी. बोरनारे हे होते तर शाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षक दिनानिमित्त उत्साह अप्रतिम होता.
दरम्यान शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनाच शाळेची जबाबदारी देण्यात आली. यापार्श्वभूमीवर मुख्याध्यापिका म्हणून श्रावणी भगवान तुपे व उपमुख्यध्यापक म्हणून यश तुपे यांनी धुरा सांभाळली. याशिवाय इतर विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षिका म्हणून उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. आर. जाधव यांनी केले.
याशिवाय शाळेचे नियमित शिक्षक एस.पी. पाटील, एस.आर. बुट्टे, एल. पी.लिंबोरे व एस. एल.भालेराव यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व समजून सांगितले. शिक्षक दिनानिमित्त शिक्षक म्हणून कार्यक्रमात सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद भाषण करत उपस्थित शिक्षक व मान्यवरांची मने जिंकली. तसेच शिक्षक होणे हे सोपे नाही हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत तुपे, रिजवान शेख व अविनाश गायकवाड हे उपस्थित होते.


Social Plugin