डी.जे.चालक व मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध पोलिसांची कारवाई
वैजापूर
'श्री' विसर्जन मिरवणूकी दरम्यान गणेश मंडळाद्वारे मोठ्या प्रमाणावर डि.जे. साऊंड व लेजर लाईटचा वापर करण्यात येतो. परंतु यावर्षी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जिल्हास्तरीय मध्यवर्ती शांतता समितीच्या समन्वय बैठकीमध्ये जिल्हयात डी. जे. साऊंड सिस्टीम व लेजर मुक्त 'श्री' विसर्जन करण्याबाबत आवाहन केले होते.
परंतु वैजापूर शहरातील दंडनायक गणेश मंडळ डी. जे. धारक शुभम इंद्रसेन भोसले (रा. डेपो रोड वैजापुर) डी.जी. साहित्य वाहन ( एम.एच. १७ टी २४६२) गणेश मंडळ अध्यक्ष प्रथमेश गुलाब पवार (रा. वैजापुर), हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान गणेश मंडळ, वैजापुर, डी. जे. धारक प्रसाद भगवान सोमवंशी (रा. म्हस्की ता. वैजापुर) डी.जी. साहित्य वाहन (एम.एच.१४ ए झेड ३५९९) गणेश मंडळ अध्यक्ष कैवल्य नंदलाल टेके रा. लाडवणीगल्ली (वैजापुर) शान ए गणेश मंडळ, धरणग्रस्तनगर, वैजापुर डी. जे. थारक तुषार राजेंद्र धिवर रा. पदमपुरा, छ. संभाजीनगर डी. जी. साहित्य वाहन ( एम.एच. २० ए टी ९०३९) या गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी मोठ्या क्षमतेने ध्वनी यंत्रणेचा वापर करतांना मिळून आले.त्यांना पोलिसांनी ध्वनीक्षेपण यंत्रणेचा आवाज कमी करण्याच्या सुचना केल्या.परंतु याकडे त्यांनी दुर्लक्ष करून डी. जे. मोठ्या आवाजात सुरूच ठेवला. यामुळे डी.जे. चालक व गणेशमंडळ पदाधिकारी यांचे विरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या अंतर्गत ध्वनी प्रदूषण तरतुदीनुसार ध्वनी प्रदूषण होते किंवा कसे त्यानुसार त्याचे सुधारित (नियमन व नियंत्रण) अधिनियम-२००० नुसार कारवाई करण्यात आली आहे. यापुढे सुध्दा अशा प्रकारे ध्वनीप्रदुषण कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डी.जे. साऊंड सिस्टम वाजविणारे चालक व आयोजक याविरुध्द सक्त भूमिका घेण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही अशा सक्त सूचना पोलीस अधीक्षक यांनी दिल्या आहेत. सदरची कारवाई डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, , पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, अंमलदार रवींद्र साळवे, योगेश झाल्टे, कुलदीप नरवडे, प्रशांत गिते, नवनाथ निकम, ज्ञानेश्वर मेटे, सचिन रत्नपारखे, रणजीत चव्हाण अजित नाचन यांच्या पथकाने केली.

Social Plugin