वैजापूर शहरातील एलआयसी ऑफिसमध्ये घडली घटना
वैजापूर
शहरातील स्वास्तिक टॉवरमध्ये असलेल्या एलआयसी कार्यालयातून एलआयसी एजंटचे एक लाख १९ हजार ९५३ रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
कडुबा दामू हिवाळे (रा. ताड पिंपळगाव, ता. कन्नड) हे एलआयसी एजंट असून ते वैजापूर येथील कार्यालयात एलआयसी हप्त्यांचा भरणा करण्यासाठी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आले होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांची जेवणाची सुटी असल्याने पैशाची पिशवी पायाजवळ ठेवून ते खुर्चीवर बसले होते. त्यावेळी हिवाळे यांची पैशाची पिशवी चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी कडुबा हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शितकांता भुरे या करत आहेत.
.jpeg)
Social Plugin