७२ क्युसेकने विसर्ग सुरू...
वैजापूर
शहरानजीकच्या नारंगी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्प तुडुंब भरला आहे. ता.२३ रोजी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून नारंगी नदीच्या पात्रात ७२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. मंगळवारी दुपारी उशिरा प्रकल्पाचा दरवाजा क्रमांक १ व ५ मधून हा विसर्ग सोडण्यात आला.
- नारंगी मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.
वैजापूर तालुका नेहमीच अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. परंतु मागील काही वर्षांत ही परिस्थिती बदलली आहे. वर्ष २०२० पासून तालुक्यात बहुतेकदा समाधानकारक पाऊस होत आहे. यंदाही सुरवातीपासूनच पावसाने जोरदार सलामी देत परतीच्या पावसाचाही जोर कायम आहे. मंगळवारी नारंगी मध्यम प्रकल्पात ९० टक्के इतका जलसाठा झाला असून ४०० क्यूसेकने प्रकल्पात पाण्याची आवक सुरू आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी उशिरा प्रकल्पाचे क्रमांक १ व ५ एक क्रमांकाचे दरवाजे एकासेंटिमीटरने वर करण्यात येऊन नारंगी नदीपात्रात ७२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला.

Social Plugin