वैजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी
वैजापूर
तालुक्यातील वीरगाव, भग्गाव व कापूसवडगाव आदी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा, दुग्धविकास व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे हे ( ता.२४) रोजी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मंत्री सावे यांनी पाहणी केली.
यावेळी मंत्री सावे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत सांगितले की, "शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असे देखील सावे म्हणाले आहे. वीरगाव परिसरात मका पिकाचे तर भग्गाव येथे सोयाबीन आणि उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनिल सावंत, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, प्रशांत कंगले, कल्याण दांगोडे, प्रभाकर बारसे, ज्ञानेश्वर आदमाने, गोकुळ भुजबळ, धनंजय धोर्डे, महेश भालेराव, महसूल व ग्रामपंचायत अधिकारी तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Social Plugin