सोमवारी रात्री झालेल्या पावसाने हजारो हेक्टर पीक पाण्याखाली : शहरातील अनेक घरात शिरले पावसाचे पाणी
वैजापूर
सोमवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील बऱ्याच भागातील पीक पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय शहरातील पंचशील नगर, गोल्डनगर आदी भागात पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले. सदरील ठिकाणाची पाहणी करून आमदार रमेश बोरनारे व डॉ दिनेश परदेशी झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना संबंधीताना केल्या आहेत. सोमवारी रात्री शहर व परिसरात सुरू झालेला पाऊस मंगळवारी पहाटेपर्यंत कोसळत होता.
दरम्यान वैजापूरसह तालुक्यातील लोणी (खु.), जानेफळ व खंडाळा या चार महसूल मंडळात अतिवृष्टीची (६५ मिलिमीटर पेक्षा अधिकचा पाऊस) नोंद झाली आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत वैजापूर तालुक्यात एकूण ५६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पावसाने तालुक्याच्या वार्षिक सरसरीचा पल्ला गाठला आहे. दरम्यान या पावसामुळे आता वैजापूर शहरातील नारंगी मध्यम प्रकल्प देखील ८५ टक्के इतक्या क्षमतेने भरला आहे. लवकरच धरणाचे दरवाजे उघडले जाणार असून जोपर्यत प्रकल्पात पाण्याची अवाक सुरू राहील तोपर्यंत दरवाजे खुले राहणार यापार्श्वभूमीवर नदीपात्र व काठच्या गावांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेत.
शहरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले
सोमवार रात्रीपासून मंगळवार सकाळपर्यँत तालुक्यातील १२ महसूल मंडळात झालेल्या पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे
वैजापूर - १११ मिलिमीटर
लोणी (खु.) - ११३.५ मिलीमीटर
जानेफळ - ८८.८ मिलिमीटर
खंडाळा- ७१.५ मिलीमीटर
बोरसर - ५९.५ मिलीमीटर
शिऊर - ५९.५ मिलीमीटर
घायगाव - ५४ मिलिमीटर
नागमठाण - ३५.३ मिलीमीटर
बाबतारा - ३२.५ मिलीमीटर
महालगाव - ३५.३ मिलीमीटर
गारज - २५.३ मिलीमीटर
लासुरगाव - १७.८ मिलीमीटर


Social Plugin