वैजापूर
ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी सायंकाळ लच्या सुमारास शहरालगत असलेल्या बाजरा फार्मलगत घडली. जनार्धन उद्धव इंगळे (२३, रा.लोणी बु.) असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे.
मृत : जनार्धन इंगळे
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जनार्धन इंगळे हा तालुक्यातील लोणी (बु.) येथील रहिवासी होता. सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास तो शहरातील स्टेशन रोडलगत असलेल्या बाजरा फार्म समोरून दुचाकीने प्रवास करत होता. दरम्यान यावेळी झालेल्या अपघातात तो भरधाव ट्रँक्टरच्या चाकाखाली चिरडून गंभीर जखमी झाला. घटना घडताच त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास हवालदार किसन गवळी हे करित आहेत.
.jpg)
Social Plugin