यंदा वैजापूरात महायुतीचाच नगराध्यक्ष : आ. सतीश चव्हाण

वैजापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १४ सप्टेंबर रोजी वैजापूरात पक्षाची आढावा बैठक पार पडली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र देखील वाटप करण्यात आले. दरम्यान नेत्यांच्या निवडणुका आता संपल्या असून आगामी काळात कार्यकर्त्यांच्या निवडणुका होणार आहेत. यंदा वैजापूरात महायुतीचाच नगराध्यक्ष होईल त्यामुळे अजित (दादा) पवार यांच्यावर विश्वास दाखवून जे पक्षासोबत आहेत अशा कार्यकर्त्यांना पक्षाकडून योग्य न्याय दिला जाईल अशी ग्वाही यावेळी आ.चव्हाण यांनी दिली.

आढावा बैठकीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. सतीश चव्हाण

या बैठकीला जेष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकील (शेठ), प्रदेश सरचिटणीस 
दिलीप  बनकर, महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद अहेमद अली,युवक जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे, सामाजिक न्यायविभाग जिल्हाध्यक्ष सुधाकर बागुल,जिल्हाउपाध्यक्ष   जयवंतराव गायकवाड, तालुकाध्यक्ष पंकज ठोंबरे शहराध्यक्ष शेख रियाज शेख अकिल, बाळासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. 


  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे बोलताना आ. चव्हाण म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही महायुतीत सामील झालो. मात्र आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या असून आगामी काळात कार्यकर्त्यांच्या निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा सामान्यांचा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांचा भ्रमनिरस होऊ देणार नाही.
यासाठी स्थानिक पातळीवर पंकज ठोंबरे व रियाज शेख ज्यांची नावे सुचवतील पक्षाच्या त्या 'परफॉरमिंग' कार्यकर्त्यांच्या नावावर आम्ही नक्कीच विचार करू असे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मित्र पक्षाकडून सन्मानाची वागणूक मिळाल्यास या निवडणुकीत महायुतीसोबत राहू असे त्यांनी बोलताना सांगितले. याशिवाय यंदा वैजापूरात महायुतीचाच नगराध्यक्ष होईल असे देखील त्यांनी ठासून सांगितले. बैठकीला  दत्तात्रय वाकलेकर, हिरा(ताई) जाधव, ज्योती(ताई) कापसे, सुरज (नाना) पवार,  बाळु  शेळके, विनायक गाडे, दिगंबर मोरे,अशोक म्हस्के, हिकमत काका, गणेश डिके, पुंडलीक गायकवाड, अमृत शिंदे,  सत्यजित  सोमवंशी, अकील कुरेशी, एराज शेख, आसिफ शेख, रजा खान, अमोल मगर, ऋषीकेश वाघ, ऋषीकेश वरपे आदींची उपस्थिती होती.


अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून ३० लाख रुपये...

मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाच्यावतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी सहा लाख असे एकूण पाच वर्षांसाठी राज्यसरकार ३० लाख रुपये अर्थसाह्य करते अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.