लडाख मॅरेथॉन स्पर्धेत मुख्याधिकारी बिघोत यांची दमदार कामगिरी..

वैजापूर

वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक भागवत बिघोत यांनी लडाख येथे आयोजित २२ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवत हे अंतर २ तास दोन मिनिटात पूर्ण करून दमदार कामगिरी केली.


१४ सप्टेंबर रोजी लडाख येथे पार पडलेल्या या स्पर्धेत संपूर्ण देशातून एकूण १ हजार ३८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान वैजापूर पालिकेची मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी ही स्पर्धा गाजवून दमदार कामगिरी करत वैजापूर शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आणले. त्यांच्या या यशाबद्दल आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी, मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, माजी उपनगराध्यक्ष साबेर खान, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.