वैजापूर
येथील 'दि वैजापुर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि. बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दरम्यान भागभांडवलदार व ग्राहक यांच्या अतुट विश्वासामुळे बँकेने प्रगतीचा आलेख गाठला असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन रविंद्र उर्फ बाळासाहेब बन्सीलालजी संचेती यांनी केले.
बँकेची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता.१३) रोजी शहरातील कृष्णा लॉन्स् येथे पार पडली. सभेला मोठ्या संख्येने बँकेचे सभासद उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन सभेस सुरुवात करण्यात आली. बँकेचे चेअरमन रविंद्र उर्फ बाळासाहेब बन्सीलालजी संचेती यांनी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असुन बँकेकडे सद्यस्थितीत ५४० कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे सांगत बँकेची गुंतवणुक ही १९० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे यावेळी सांगितले. याशिवाय बँकेच्या माध्यमातुन आजपर्यंत १४० पेक्षा जास्त गरजु तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला असून बँकेमार्फत कर्जदार व सभासदांसाठी अपघात विमा योजना देखील लागु केल्याची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. या बैठकीत सभासदांसमोर रविंद्र संचेती यांनी दि. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर केला. यासह मांडलेल्या १ ते १६ विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली.
या सभेला मंचावर जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी, बँकेचे उपाध्यक्ष उल्हास ठोंबरे, अॅड. प्रमोद जगताप, विशाल संचेती, प्रितम मुथा, विनय सुराणा, सुरेश तांबे, विजय वेद, विजय दायमा, सावन राजपुत, महेंद्र गुंदेचा, विनोद गायकवाड, मनोज छाजेड, सौरव संचेती, प्रशांत त्रिभुवन, प्रकाश पिरबाणी, अंकीत मालपाणी, शालिनी सोमाणी, वैशाली साखरे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सभेचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम. कोठारी यांनी केले. सुत्रसंचालन सावनसिंग राजपुत यांनी केले तसेच आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी. तांबे यांनी केले.वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीतेसाठी बँकेचे शाखाधिकारी, व्हि. डब्ल्यु. कोरडे, एस.जे. साकला, सी.एम.आवारे, आर.ई.फल्ले, एस.ए. लाहोटी, आर.एन. साळवे, सी.व्ही. शर्मा, एस.आर. सोनवणे, एस.एस. जगताप व समस्त कर्मचारी वृंदांनी पुढाकार घेतला.


Social Plugin