चौघांची घटनास्थळाहुन धूम....
वैजापूर
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यातील दोघांना छञपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रा.) पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गावठी कट्टा, जीवंत काडतुस व इतर साहित्यासह ताब्यात घेतले. अमोल साईराम गायकवाड व गोविंद निवृत्ती पवार (दोघे रा. बेलगाव ता. वैजापुर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असून लक्ष्मण उर्फ लखन नामदेव जगताप, विक्रम उर्फ विकी बाळासाहेब बोरगे ( दोघे रा. भग्गाव ता. वैजापुर) व ईतर दोन ईसम ज्यांची नावे माहित नाहीत असे चौघेजण घटनास्थळाहुन पळून गेले.
स्थागुशाच्या पोलिसांनी दोघांसह एक लाख ५९ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री छञपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे (ग्रा.) पोलिसांचे पथक वैजापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांतील गुन्हेगार यांचा शोध घेत असतांना त्यांना त्यांचे गुप्त बातमीदार यांचेकडुन खात्रीलायक माहिती मिळाली की, मुंबई नागपुर हायवे लगत बेलगाव शिवारातील इंडीयन ढाब्यासमोर एका हुंदाई कंपनीच्या वरना कार मध्ये पाच ते सहाजण थांबलेले असुन ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्था. गु.शा. पथक यांनी सदर माहिती ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांना दिली. पो.नि. राजपुत यांनी सदरची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना कळविली. सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक, छत्रपती संभाजीनगर (ग्रा.) डॉ. विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधिक्षक अन्नपुर्णासिंह यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शाचे पोनि राजपुत यांनी संशयितांना पकडण्याकरीता योग्य नियोजन करुन सापळा लावुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी कारमध्ये बसलेले ईसम यांच्यावर अचानक जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन ईसम यांना जागीच पकडले. परंतु इतर चार ईसम हे अंधाराचा व शेजारील मकाचे पिकाचा फायदा घेत पळून गेले. पकडेलेले ईसम यांना पथकाने विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे अमोल गायकवाड व गोविंद पवार (रा. बेलगाव) असे असल्याचे सांगुन पळून गेलेले दोघांचे नावे लक्ष्मण उर्फ लखन जगताप व विक्रम उर्फ विकी बोरगे व इतर दोन इसम यांची नावे माहित नसल्याचे कळविले. पथकाने त्यांचेकडे असलेली वरणा कारची झडती घेतली असता त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठीचे एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, नायलॉन दोरी, वायर कापण्याचे कटर, पत्रा कापण्याचे कटर, होतोडी, छन्नी, लोखंडी पकड, लोखंडी पाना, लोखंडी सळई, चाकु, सी.सी.टीव्हीवर मारण्याचे काळ्या रंगाचे स्प्रे, एक्साब्लेड, चेह-याच मास्क, मिरची पावडर, अंबरदिवा, सायरन, पोलीस लाठी,रेगजीन सँग, दोन मोबाईल असा एकूण एक लाख ५९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णासिंह यांचे मार्गदर्शनाखील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांचे नियोजनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.उपनिरीक्षक, महेश घुगे, पोह श्रीमंत भालेराव, सचिन राठोड, बलविरसिंग बहुरे, पो. अं. शिवाजी मगर यांनी केली.

Social Plugin