होमिओपॅथिक डॉक्टर्सना आधुनिक औषधी उपचारपद्धतीसाठीचा मार्ग मोकळा...

राज्य सरकारचे परिपत्रक जारी.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेस सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी करण्याचे निर्देश.



छत्रपती संभाजीनगर

१६ जुलै रोजी राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथिक डॉक्टरांनी मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन करत सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टर्स यांचे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्यात यावी यासाठी आंदोलन केले होते. आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वासन देत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते. 




त्या अनुषंगाने आज शुक्रवार (०५) रोजी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून सीसीएमपी उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टर यांचे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत स्वतंत्र नोंदणी करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेस दिले.  यामुळे राज्यातील एक लाखापेक्षा अधिक होमिओपॅथिक डॉक्टरांनी या आदेशाचे स्वागत केले आहे. या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणारे डॉ.बाहुबली शाह
(प्रशासक,एम.सी.एच.मुंबई)यांची व त्यांच्या सहकार्‍यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने राज्यातील होमिओपॅथिक संघटनेंने त्यांचे व मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित(दादा) पवार, वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व सर्व आमदारांचे होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत त्वरित मार्गी लावला यासाठी या सर्वांचे आभार मानले आहे.