भाविकांचा उत्तम प्रतिसाद
वैजापूर
येथील स्वामी समर्थ केंद्रात "श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळाच्या"वतीने गुरुवार (ता.०४) रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत 'श्री गणपती अथर्वशीर्ष' पठण करण्यात आले.
या अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात मोनिका गंडे यांनी सामूहिकरित्या वाचन केले. यावेळी २०३ पुरुष व महिला सेवकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. मंडळाचे अध्यक्ष सचिन वाणी, लिमेश वाणी, देविदास वाणी, घनश्याम वाणी, अरविंद तुपे, उत्कर्ष अनर्थे,बापूसाहेब गावडे,संकेत वाणी,तुषार अनर्थे,ऋषिकेश राजपूत,रोहित गुळस्कर, अक्षय वाणी यांनीही यावेळी सहभाग नोंदविला.
या प्रसंगी उपस्थित सर्व सेवेकऱ्यांना धोंडीरामसिंह राजपूत यांनी निर्माल्य विल्हेवाट, स्वच्छता, पर्यावरण प्रदूषण, वृक्षारोपणासह श्री गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. विसर्जन मिरवणूक ही पारंपरिक वाद्य लावूनच काढावी व नगर पालिकेने तयार केलेले कृत्रिम तलावातच गणपती विसर्जन करण्याचे आवाहनही राजपूत यांनी यावेळी केले.


Social Plugin