वैजापूर
औंढा नागनाथ ते शिर्डी पायी दिंडी सोमवार (ता.१५) रोजी शहरातील वैष्णवी लॉन्स येथे थांबली. दिंडीतील साईभक्तांचे बोथरा परिवाराच्यावतीने संतोष बोथरा,प्रकाश बोथरा, विनोद बोथरा यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दिंडीतील साईभक्तांसाठी जेवणाचेही आयोजन करण्यात आले. दरम्यान साईंच्या सांजआरतीच्या वेळी वैजापूर येथील प्रति साईबाबा म्हणून धोंडीरामसिंह राजपूत यांनी सहभागी होऊन भक्तांना प्रति साईबाबांचे दर्शन घडविले.
यावेळी पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगरसेवक सुभाष गायकवाड,संतोष बोथरा, विनोद बोथरा,प्रकाश बोथरा, राजेंद्र पारख,सुभाष गायकवाड, जीवनलाल बोथरा, सुदीप भाटिया,जीवन बागमार, रोहित जोशी,गिरीश भालेराव व शहरातील विविध भागातील जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. बोथरा परिवार गेल्या १६ वर्षांपासून या पायी दिंडीतील साई भक्तांची निवास व भोजन व्यवस्था करतात.

Social Plugin