जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ओमकार त्रिभुवन याचे यश

१७ वर्ष वयोगटात सिल्व्हर मेडल

वैजापूर
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल (गारखेडा परिसर) येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारात येथील सेंट मोनिक इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी ओमकार संदीप त्रिभुवन याने १७ वर्ष वयोगटात रजत (सिल्व्हर) पदक पटकावले.  


ओमकार त्रिभुवन

त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या सचिव शिल्पा (ताई) परदेशी तसेच मुख्याध्यापक किशोर साळुंखे, मुख्याध्यापिका स्वाती खैरनार, क्रीडा शिक्षक वकार पठाण,गौरव गायकवाड आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.