भगूर येथे पोकरा योजनेत झालेल्या कामांना आंध्रप्रदेश येथील पथकाची भेट

सदरील योजना आंध्रप्रदेशात राबविण्यास मदत होणार

वैजापूर
तालुक्यातील भगूर गावात तालुका कृषी विभागामार्फत झालेल्या पोकरा टप्पा एक मधील विविध कामांना आंध्र प्रदेश राज्य पथकाने अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट दिली.
भगूर येथील प्रगतीशील शेतकरी अनिल चव्हाण यांच्या वस्तीवर सदरील कार्यक्रम पार पडला. आंध्र प्रदेश येथून आलेल्या पथकात एम.एस.वेणुगोपाल, के.एस. शास्त्री, टी.व्ही. सुब्बाराव, एम .रेवती, उषाकिरण यांच्यासह १३ अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट दिली. 



कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी  व्यंकट ठक्के यांनी प्रास्ताविक केले तर आलेल्या मान्यवरांचे गावकऱ्यांनी स्वागत केले. सदरील कार्यक्रमात प्रतिनीधिक स्वरूपात गावातील शेतकरी सुनील चव्हाण, सतीश शिंदे, अमोल बुट्टे, संजय शिंदे यांनी पोकरा योजनेत झालेल्या कामांची व त्यापासून शेतकऱ्यांना उत्पादनात झालेल्या वाढीची माहिती त्यांच्या मनोगतातून दिली. 



सदरील पथकाने सुनील चव्हाण यांची शेडिंग नेट मधील शिमला मिरची लागवड ,ठिबक सिंचन तुषार सिंचन ,ज्ञानेश्वर चव्हाण यांचे साठवणूक गोदाम व कांदा चाळ,अनिल चव्हाण यांनी शेडिंग नेट मध्ये मिरची पिकामध्ये टाकलेली विड मॅट, शेततळे व मच्छी पालन, गणेश जगताप यांचे जिरेनियम ऑइल प्रक्रिया युनिट व पपई लागवड आणि वातानुकूलित कांदा चाळ, माळी सागज येथील हरिभाऊ गाडेकर यांची तुती लागवड व प्रत्यक्षात सुरू असलेला रेशीम उद्योग प्रकल्प, योगेश गाडेकर यांचे मुरघास युनिट व दूध चिलिंग युनिट याविषयी उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी प्रत्यक्षात शेतावर सदर प्रकल्पांची अभ्यास दौऱ्यातील सदस्यांना माहिती दिली. 



सदरील पथकाने प्रत्यक्षात झालेले कामे बघून समाधान व्यक्त करून आमच्या राज्यात सदरील योजना राबविण्यास मदत होईल अशी आशा यावेळी व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके, उपकृषीधिकारी माधव गांगुर्डे ,गोविंद पोळ ,सहाय्यक कृषी अधिकारी ठकाजी खेमनार, राजेंद्र पंडोरे ,विद्या पालवे ,राधा निकाळे ,अर्चना सोनवणे,जीवन चव्हाण,अनिल चव्हाण,कृष्णा चव्हाण, सुनील चव्हाण,ज्ञानेश्वर चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी गावातील सरपंच जनार्दन चव्हाण, नानासाहेब मेंढे, सुभाष शिंदे,सतीश शिंदे,अमोल बुट्टे, भूषण बुट्टे, मनसाराम चव्हाण, विनोद चव्हाण, रामनाथ भराड, संतोष चव्हाण,शंकर शिंदे, तांबे नाना , राजधर शिंदे, हंसराज जाधव, कुणाल चव्हाण, नवनाथ चव्हाण, उद्धव काळे, भूषण चव्हाण, अविनाश मोरे, गणेश जगताप, आप्पासाहेब बुट्टे, नितीन चव्हाण, सुनील चव्हाण यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.