वैजापुरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी...

मुस्लिम बांधवांनी मिठाई वाटून दिल्या शुभेच्छा...

वैजापुर 
हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) रविवारी (ता.७) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील मुस्लिम बहुल परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.



शहरात ईद-ए-मिलाद दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त जामा मस्जिद परिसर, दर्गा वेस,खान गल्ली,मुस्तफा पार्क आदी परिसरांत रस्त्यांच्या दुतर्फा सजावट केल्याचे चित्र होते. याशिवाय विविध रंगाच्या पताका, चमकी लावून सजावट करण्यात आले होती. 



याबरोबरच ठिकठिकाणी  स्वागतकमानी उभारण्यात आल्या होत्या. ईद निमित्त शहरात शांती व बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या  रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानवतेचे संदेश देणारे फलक फेरीतील नागरिक व मुलांच्या हातात होते. जुलुस जुम्मा मस्जिद जवळ आल्यावर गुलाब पूष्प व मिठाई देऊन रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, विशाल संचेती, हाजी अकील शेख, साबेरखान, मजीद कुरेशी, हमीद कुरेशी, राजू गणी, शेख,काजू काझी, काजी हाफीजोद्दीन, अल्ताफ बाबा,वसीम शेख, नदीम शेख, खालिक शेख, अतीक शेख, आवेज शेख,शादाब खान, एहतेशाम खान यांनी मिरवणुकीतील नागरिक व मुलांना गुलाब पुष्प व मिठाई वाटून शुभेच्छा दिल्या.