रविवारी पार पडले 'पोलिसांच्या बाप्पाचे' विसर्जन...
वैजापूर
वैजापूर शहरातील ५६ सार्वजनिक गणेश मंडळानी शनिवारी विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदविला. या शिवाय घरगुती गणारायांचे देखील बाल गोपाळासह थोरा मोठ्याने देखील 'पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात बाप्पाला निरोप दिला.
यंदा तालुक्यात १५० सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री स्थापना केली होती. या मध्ये शहरातील ५६ सार्वजनिक मंडळांचा समावेश होता. शहरालगत असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्प व शासकीय विहिरीवर 'श्री' विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून शहरातील महाराणा प्रताप रोड- जुनी भाजी मंडई-#मुख्य बाजारपेठ- जामा मस्जिद-पाटील गल्ली - विसर्जन स्थळ असा मार्गक्रमण करत मुख्य विसर्जन मिरवणुक पार पडली. या वेळी बहूतेक गणेश मंडळांनी डीजेच्या तालावर आपल्या लाडक्या बाप्पांंना निरोप दिला. या वेळी गणेश मंडळांना आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी, मर्चंट बँकेचे चेअरमन रविंद्र संचेती, विशाल संचेती यांनी भेटी दिल्या. विसर्जन मिरवणुकी दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोहेकॉ योगेश झाल्टे, रावसाहेब रावते, ज्ञानेश्वर मेटे, अविनाश भास्कर, रणजीत चव्हाण, प्रशांत गीते, किरण रावते, अजित नाचन आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.
'पोलिसांच्या बाप्पाचेही' विसर्जन...
रविवारी सायंकाळी वैजापूर 'पोलिसांच्या बाप्पाचे' विसर्जन पार पडले. यावेळी पोलिसतील भक्तांनी पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरला. मिरवणुकी दरम्यान खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, डॉ.दिनेश परदेशी,संजय बोरनारे व इतरांनी पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांचे स्वागत केले.


Social Plugin