तहसिलदार सुनील सावंत यांचा सन्मान

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र 

वैजापूर

तहसिलदार सुनिल सावंत यांना सन २०२४-२५ या महसुली वर्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उत्कृष्ट तहसिलदार म्हणून प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार (ता.०८) रोजी हा कार्यक्रम पार पडला.  सन २०२४-२५ या महसुली वर्षातमहसूल वसुली उद्दीष्टापेक्षा जास्त (१०८ टक्के इतकी),पीक पाहणी, गौण खनिज कारवाया, आदिवासी वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रमाणपत्र वाटप, रेशन कार्ड वाटप व इतर महसुली कामे निर्धारित वेळेत यशस्वीरित्या पार पाडली. याशिवाय अॅग्रीस्टीक नोंदणी, पिक पाहणी, लाडकी बहिण योजना, गौण खनिज कारवाया यामध्ये देखील तहसिलदार सावंत यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. दरम्यान मयत शेतकऱ्यांचे सातबारा (जिवंत सातबारा) वारसांच्या नावे करण्याची अनेक प्रकरणे मार्गी लावली. त्यामुळे तहसीलदार सुनील सावंत यांना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.