अमरावती येथील पथकाने केली पाहणी
वैजापूर
स्वच्छ व सुंदर बसस्थानक सर्वेक्षण -२०२५अंतर्गत वैजापूर बस स्थानकाची शुक्रवार(ता.०८) रोजी अमरावती प्रादेशिक राज्य मार्ग परिवहन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे( नियंत्रण--५ ) व वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी राकेश पवार यांच्या पथकाने पाहणी केली.
शहरातील जेष्ठ समाजसेवक व स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत व प्रवासी मित्र हरीश कुमावत यांच्या समवेत बस स्थानक स्वच्छता, ओला -सुका कचरा विलगीकरण, येथील शौचालय स्वच्छता, प्रवासी आसन व्यवस्था, डस्ट बिन व्यवस्था, बसेस वेळापत्रक या सर्व बाबींची तपासणी केली. या तपासणी दरम्यान समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत व हरीश कुमावत यांच्याकडून शंभर गुणांची अभिप्राय प्रश्नावली भरून घेतली. बस स्थानक व्यवस्था व स्वच्छता तसेच एकंदरीत व्यवस्थेबाबत रोहन पलंगे यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान दोन वर्षांपूर्वी वैजापूर बस आगराला व स्थानकाला लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले होते.
या वर्षी ही कोटीचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. वृक्षारोपण व पार्किंग व्यवस्था करण्याच्या सूचना तपासणी समिती यांनी आगर प्रमुख किरण धनवटे यांना दिल्या. यावेळी किरण धनवटे व स्थानक नियंत्रक कृष्णा जाधव यांनी संबंधितांना सविस्तर माहिती सादर केली. याप्रसंगी सहाय्यक वाहतूक अधिकारी एस. के.गरुड, गोपाल पगारे, जनार्दन कोकाटे,कीर्ती जाधव,सचिन राऊत, आदिनाथ मुळे, सागर सुरासे यांची उपस्थिती होती.
Social Plugin