राजकीय मंडळी, पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी व चिमुकल्यांनी साजरा केला सण
वैजापूर
जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश असा आहे की येथे सर्व नाती, संबंध व ऋणानुबंध जपली जातात. या देशात प्रत्येक नात्याला एक वेगळे महत्व असून त्यासाठी विशिष्ट सण आहेत आणि त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व देखील आहेत. मग भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण-भावाचे नाते म्हणजे बालपणातील त्या दंगा, मस्ती, खोड्या आठवतात. दोघांमधील नात्यांचा हा सण श्रावण महिन्याच्या पोर्णिमेला येतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते. त्याच्या प्रगती अन् दिर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. तसेच आयुष्यभर भावाने आपले रक्षण करावे, असे वचन बहीण भावाकडून घेते. अशा या सणाची वैजापूर शहरातील राजकीय मंडळी, पोलिस व लहानग्यांनी साजरा केलेल्या रक्षाबंधनाची A to Z क्षणचित्रे.
Social Plugin