वैजापूरात भव्य तिरंगा यात्रा

भाजप पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग

वैजापूर

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने  धाडस दाखवत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यावेळी भारतीय सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या पार्श्वभूमीवर ११ ऑगस्ट रोजी शहरातील नागरिक, युवक-युवती, लहानग्यांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रचंड उत्साहाने तिरंगा पदयात्रा काढली. 


शहरातील ठक्कर बाजार-जुने बस स्थानक-संकट मोचन हनुमान मंदिर- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व शिवराई रोड मार्गे हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारक पर्यँत ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम,भारतीय सैनिकांचा विजय असो,ऑपेरेशन सिंदूर झिंदाबाद,जय जवान -जय किसान, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणांनी  परिसर दणाणून गेला होता. सर्वप्रथम जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की, भारतीय सेना सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. यामुळे संपूर्ण देशवासीय सुरक्षित आहेत. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये.  एकजुटीने देशप्रेमाचे तेज जपूया व भविष्यासाठी निर्धार बाळगू या, दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणाऱ्या आपल्या सैनिकांच्या  बाजूने खंबीरपणे उभं राहूया असे उपस्थितांना आवाहन  केले. या पदयात्रेत डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह अविनाश गलांडे, विशाल संचेती,कचरू  डिके, धोंडीरामसिंह राजपूत, मजीद कुरेशी,बिलाल सौदागर, प्रमोद कंगले, जयमाला वाघ,अनिता तांबे,शैलेश चव्हाण, गौरव दोडे, राजेश गायकवाड, संदीप ठोंबरे, शैलेश पोंदे,प्रवीण तांबे, विनोद राजपूत, गोकुळ भुजबळ, सोनू राजपूत, डॉ. योगेश राजपूत, गणेश खैरे, ऍड धरमसिंग राजपूत, प्रेम राजपूत, जवाहर कोठारी, ज्ञानेश्वर आदमाने, गिरीश चापानेरकर, जितेंद्र पवार, शिवा थोरात, सन्मित खनिजो आदींनी सहभाग नोंदविला.