हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाजाला दिशा मिळते - महंत रामगिरी महाराज

मुख्यमंत्र्यांच्या व लाखो भाविकांच्या उपस्थितीत १७८  व्या अखंड  हरिनाम सप्ताहाची सांगता


वैजापूर
स्वातंत्र्य पूर्वकाळात तरूण व्यसनाच्या आहारी जात होता अशा तरुणांना सप्ताहाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रवाहात आणण्यासाठी गंगागिरी महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली होती. मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्याच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे,  मनोवृत्तीत बदल झाला  तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात असून सप्ताह काळात वीस ते पंचवीस लाख लोकांनी अध्यात्म, विज्ञान, संस्कृती, भजन-कीर्तन, कृषी प्रदर्शन यामधून अध्यात्म व विज्ञान याची सांगड घातली. यामुळेच समाजात परिवर्तन घडते असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.



       श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटाचा योगीराज गंगागिरी महाराज१७८ वा अखंड हरिनाम सप्ताहातील सांगतेच्या काला किर्तनातून "कृष्णा वेध येली विरहिणी बोले" ह्या  संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगातील  कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी  गोपी चंद्राला पाहून म्हणते की, "हे चंद्रा, तू माझ्या अंगाला उबारा देत आहेस, पण मला चंदन लावू नकोस, वाराही घालू नकोस. कारण कृष्णाशिवाय मला काहीही चांगले वाटत नाही." 
या अभंगात, विरहिणी गोपी कृष्णाच्या विरहाने किती दुःखी आहे, तिची व्याकुळता, आणि कृष्णाशिवाय तिला कशातच आनंद मिळत नाही हे विरहान रचनेतून महाराजांनी स्पष्ट  केले. रचनेचे विवेचन करताना महाराज पुढे म्हणाले की, आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे.गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातुन अनेकांचे व्यसन नष्ट झाले स्वातंत्र्यपूर्व  काळातही महाराजांनी अनेक अडचणींना सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले.


अध्यात्मात आल्यास भजन - किर्तन नाही आले तरी चालेल परंतु वाईट मार्गाने तरी तरुण जाणार नाही .शास्त्र हे नित्य नवीन असुन अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घातल्यास मानवी आरोग्यासाठी फार मोठी देणगी आहे.त्यामुळेच युवकानी व्यसनाच्या आहारी न जाता अध्यात्मिक मार्गावर चालल्यास तरुणाना चांगली दिशा मिळेल.



 दरम्यान महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची  सांगता करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंधारण मंत्री गिरीश महाजन,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रमेश बोरनारे,आमदार विठ्ठलराव लंघे,आमदार अमोल खताळ, जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी, भानुदास मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, अविनाश गंलाडे, डॉ प्रकाश शेळके सावदा आश्रमाचे मंहत कृष्णगिरी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योगानंद महाराज विक्रम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्या लाखो भाविकांची उपस्थितीती होती.


संत शक्ती मैदानात उतरली त्यामुळे सगळयांचा सुपडा साफ झाला : 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले की, संत शक्ती मैदानात उतरली त्यामुळे सगळयांचा सुपडासाफ झाला व्होट जिहादच आक्रमण हे हिंदू संस्कृतीवर आक्रमण आहे.  हे जेव्हा आम्ही रामगिरीजी महाराज व इतर संतांच्या लक्षात आणून दिले तेंव्हा सर्व संत-महतांनी हे आक्रमण परतवून लावले.अध्यात्म समाजाला प्रेरणा देते म्हणून मी या सप्ताहाला पुन्हा येईल. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह पाहून मला  अथांग महासागराप्रमाणे येथील भाविकांचा महासागर दिसतोय व हे बघून मी भारावून गेलो. शनिदेव गाव येथील उच्च पातळीचे बंधाऱ्याचे काम लवकरच सुरू होईल व श्री क्षेत्र गोदाधाम साराला बेटाचा १०९ कोटींचा विकास आराखडा असेल आमचे सरकार ते करण्यास सकारात्मक व कटिबद्ध असल्याचे देखील मुख्यमंत्री फडवणीस यांनी यावेळी आश्वासन दिले.