संत ज्ञानेश्वर (माऊली) यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यशासनाचा विशेष निर्णय
वैजापूर
संत ज्ञानेश्वर (माऊली) यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यशासनाने एक विशेष निर्णय घेतला असून १४ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत 'पसायदान' चे सामूहिक पठण करण्यात यावे असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै रोजी दिलेल्या
निर्देशानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने
३१ जुलै २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. शिक्षण आयुक्त, पुणे यांना संबोधित या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५० व्या जयंतीचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२५ रोजी 'गोकुळ अष्टमी' आहे. त्या पूर्वसंध्येला म्हणजे १४ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये 'पसायदान' म्हणण्यात यावे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, या उपक्रमाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. यासंदर्भातील आवश्यक सूचना सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांना दिल्या जाव्यात आणि त्यांचे योग्य ते पालन होण्याची खात्री करावी.
Social Plugin