एकाविरुद्ध गुन्हा दाखल
वैजापूर
शहरातील मध्य वसाहतीत असलेल्या एका पेट्रोल पंप परिसरात पेट्रोल टाकून आग लावणाऱ्या एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख हमीद शेख (रा. खंडोबा नगर, वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
संग्रहित छायाचित्र
शहरातील येवला रोडलगत नंदलाल सूरजमल बोथरा यांचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शाहरुख हा आला. त्याने प्लास्टिक बॉटलमध्ये आणलेले पेट्रोल पंप परिसरात टाकले. तसेच काडीपेटीने आग लावून तो पळून गेला. पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी नंदलाल बोथरा यांच्या फिर्यादीवरून शाहरुख शेखविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin