नारंगी मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच..

प्रकल्पात २१ टक्के जलसाठा

वैजापूर

मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्हयातील पाणलोट क्षेत्रात पावसाचे संततधार सुरू असल्याने तिथेल विविध धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 


या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरण देखील १०० टक्के क्षमतेने भरल्याने या धरणातून  विसर्ग सुरू आहे. दरम्यान या धरणातील अतिरिक्त पाणी हे पालखेड डाव्या कालव्याव्दारे वैजापूर शहरालगत असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्पात सोडण्यात आले आहे. १०० क्युसेकने हे पाणी सोडण्यात आले असून मात्र प्रत्यक्षात हे पाणी ८५ क्युसेकनेच नारंगी मध्यम प्रकल्पात येत आहे. आतापर्यंत वैजापूर ची तहान भागविणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पात २१ टक्के पाणीसाठा  झाला आहे.