वैजापूर तालुक्यातील खिर्डी येथील घटना
वैजापूर
एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील खिर्डी येथे गुरुवारी दुपारी घडली. पुनम अशोक पवार (१३) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.
मृत : पूनम पवार
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिर्डी येथे दुपारी ३ वाजेच्या सुमारास गल्लीत खेळत असताना लहान मुलांचे व तिचे भांडण झाले होते.त्यावेळी तिच्या घरी कोणी नव्हते. रागाच्या भरात ती घरात गेली.आतून कडी लावून तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.वडील व आजी घरी आल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली.त्यांनी तातडीने तिला देवगाव रंगारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले.या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले हे करीत आहेत.
Social Plugin