वैजापूरात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


शासकिय कार्यालयांसह शाळा व महाविद्यालयात 
ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम

वैजापूर 
शहर व परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध शासकिय कार्यालयांसह शाळा व महाविद्यालयात ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीपर गीत गायन, प्रभातफेरी, स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक कुटुंबियांचा सन्मान असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आले. मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या हस्ते झाले.


मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी कार्यालयात झाला.


तालुक्यातील म्हस्की येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. याशिवाय शहरात विविध शासकीय कार्यालयात पार पडलेल्या ध्वजारोहणाला जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, साबेरखान, विशाल संचेती, आर. डी. महाजन, तलाठी गजानन जाधव, योगेश पुंडे, दीपक त्रिभुवन, पारस पेटारे आदींसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


    पोलिस ठाण्याच्या कवायत मैदानात ध्वजारोहण पार           पडल्यानंतर उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी.

 


    
उपविभागीय कार्यालयात ध्वजारोहणासाठी वैजापूर            मराठी पत्रकारसंघाचे सदस्य इतर मान्यवर उपस्थितीत होते.


दरम्यान तहसिल कार्यालयात तहसिलदार सुनिल सावंत, नगरपालिकेत प्रशासक भागवत बिघोत, पोलिस ठाण्याच्या कवयात मैदानात पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले,पंचायत समितीत गट विकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले.