नारंगी मध्यम प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू..
वैजापूर
नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातील अतिरिक्त पाणी वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात सोडण्यात आले. धरणातून १०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला असून साधारणतः १५ ते २० दिवस हे पाणी सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दिवसांत धरणात बऱ्या पैकी जलसाठा उपलब्ध होणार असून 'नारंगी'त पाणी सोडल्यामुळे वैजापूरकरांसह लाभक्षेत्रातील जवळपास २० गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शहरातील नारंगी मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील जलसाठा पुढीलप्रमाणे
नारंगी मध्यम प्रकल्प - ०९.८१ टक्के
बोरदहेगांव मध्यम प्रकल्प - ००.०० टक्के
कोल्ही मध्यम प्रकल्प - ७०.४९ टक्के
बिलोणी लघू प्रकल्प - ००.०० टक्के
खंडाळा लघू प्रकल्प - ५९.०० टक्के
जरुळ लघू प्रकल्प - ००.०० टक्के
सटाणा लघू प्रकल्प - ४५.५७ टक्के
गाढेपिंपळगाव लघू प्रकल्प - ५५.९८ टक्के
मन्याड साठवण तलाव - १०० टक्के
Social Plugin