घरोघरी राबवा ‘हर घर तिरंगा अभियान’- जिल्हाधिकारी स्वामी


दुरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी साधला अधिकाऱ्यांशी संपर्क

छत्रपती संभाजीनगर

देशभक्तीचे उत्साहपूर्ण वातावरण असून त्यात घरोघरी हर घर तिरंगा हे अभियान राबवा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.


यासंदर्भात ता. १३ रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यालये, आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी जिल्हाधिकारी स्वामी यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा  संगिता राठोड,एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी मुख्यालयातून सहभागी झाले होते. यावेळी श्रीमती राठोड यांनी अभियान राबविण्याची कार्यपद्धती सांगितली. आपापली गावं, शहरात या अभियानात लोकांना सहभागी करुन घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याशिवाय जिल्हाधिकारी स्वामी यांनीही अभियानाची छायाचित्रे केंद्रशासनाच्या वेबसाईटवर अपलोड करावी असे आवाहन केले.