Social News : भगवान बेडवाळ यांचा सेवापूर्ती सोहळा

तालुक्यातील बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक म्हणून घेतली सेवानिवृत्ती

वैजापूर 
तालुक्यातील बोरसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले भगवान बेडवाळ यांनी त्यांची ३३ वर्षाची सेवा पूर्ण करून ते वयाच्या ५८ व्या वर्षी नुकतेच सेवानिवृत्त झाले.


 
त्यांचा सेवापूर्ती सोहळा सोमवार (ता.०८)रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव भावसिंग बैनाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गंगापूरचे तालुका आरोग्य अधिकारी बी.डी. तुपे हे होते.  सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत, कन्नड वकील संघाचे अध्यक्ष ऍड.कृष्णा जाधव, पुनमसिंग डोंगरजाळ, राजु छानवाळ,सेवा निवृत्त पोलीस अधिकारी पी.एस.शेवंगण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.भगवान बेडवाळ व  रेखा(ताई) बेडवाळ यांचा याप्रसंगी उपस्थितांनी सत्कार केला. त्यांची मुले अजयसिंग, अजितसिंग व मुलगी अश्विनी चुंगडे यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमा दरम्यान धोंडीरामसिंह राजपूत यांनी स्वलिखित शेतकरी व्यथा "तगादा" देऊन बेडवाळ यांचा सत्कार केला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरसर,बेंदवाडी,परसोडा  येथील आरोग्य कर्मचारी  व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केली.