Docter's Association New President : वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. नितेश शहा

सचिवपदी डॉ. संदीप म्हस्के यांची निवड

वैजापूर

वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या (VDA)अध्यक्षपदी डॉ.नितेश शहा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शनिवारी पार पडलेल्या बैठकीत डॉ. सुभाष भोपळे, डॉ.एस.एम जोशी डॉ. राजीव डोंगरे, डॉ.योगेश राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. 


  दरम्यान नवनियुक्त कार्यकारिणीच्या  सचिवपदी डॉ.संदीप म्हस्के, उपाध्यक्षपदी डॉ.चैतन्य तांबे, डॉ. भास्कर भांड, डॉ.बाबा इंगळे तर कोषाध्यक्ष म्हणून डॉ. दर्शन पारशर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ सुभाष भोपळे व सचिव डॉ. योगेश राजपूत यांनी नवनियुक्त कार्यकारिणीच्या निवडीला अनुमोदन दिले. 


याशिवाय वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनचे (VDA) इतर कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ.अमोल इंगळे, डॉ.एजाज शेख, डॉ. गजकुमार संघवी, डॉ. नवनाथ सोनवणे, डॉ. नयन मोरे, डॉ.शरद साळुंके, डॉ.संदीप वऱ्हाडे,डॉ.शफीक खान, डॉ. नफिसा खान यांचा समावेश करण्यात आला.  या बैठकीला डॉ.अभिजीत अन्नदाते, डॉ.गणेश अग्रवाल, डॉ. ईश्वर अग्रवाल, डॉ. मोहित बोरा यांच्यासह तालुक्यातील डॉक्टर्स उपस्थित होते.