Religious News- आषाढी एकादशीला वैजापूरात हरी दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी

भाविकांनी दर्शनासह घेतला महाप्रसाद..

वैजापूर

शहरातील महाराणा प्रताप रोडलगत असलेल्या 'एकटा विठोबा' मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुंजोबा मित्रमंडळाच्यावतीने भाविकांना श्री हरी दर्शनासाठी शिस्तबद्ध व्यवस्थापन करण्यात आले.

     
    तत्पूर्वी रविवारी सकाळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी,माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या हस्ते श्री हरी मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. याशिवाय पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनीही सपत्नीक श्री हरी दर्शन घेतले. 


     दरम्यान 
आषाढी एकादशी निमित्त शहरासह तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून मंदिरात दर्शनासाठी दुपारनंतर ही दिंड्या येत आहेत. दिंड्या मंदिर परिसरात पोहचताच मंडळाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येत असून दर्शनानंतर दिंडीतील वारकऱ्यांसह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील प्रसाद वाटप करण्यात येत आहे. पावसाने उघडीप दिल्याने दुपारनंतरही श्रीहरी दर्शनासाठी  भाविकांची रिघ लागली होती.  मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुंजोबा मित्र मंडळाच्यावतीने दर्शन व्यवस्थापनासह पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या  आयोजनासाठी मुंजोबा मित्र मंडळाचे शांतीलाल संचेती, रविंद्र जेजुरकर, स्वप्नील जेजुरकर, संदीप पेहरकर, अजय जगताप, शंतनु सोनवणे, अशोक बोराडे, राजू साकला, दीपक साकला, राजू पेहरकर, कुमोद जेजुरकर, संजय जेजुरकर,आनंद शर्मा, गणेश राजपूत, जय ठोंबरे, आदींनी परिश्रम घेतले.