शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई येथे दिमाखदार प्रवेश सोहळा
वैजापूर
वैजापूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष हाजी अकिल शेख यांनी माजी नगरसेवक तसेच विविध पक्षातील पदाधिकारी आणि ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच, सदस्य व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता.०८) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान हाजी अकिल शेख यांच्या सोबत माजी नगरसेवक तथा बाजार समिती संचालक शेख रियाज शेख अकिल, सय्यद हिकमत, सुल्तान कुरेशी, नगरसेवक बिलाल सौदागर, भागीनाथ त्रिभुवन, हरीभाऊ बागुल, शेख इरफान गणी, विधितज्ञ राफे हसन पीरजादा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष अल्ताफ बाबा, सलीम वैजापुरी, एमआयएमचे माजी तालुकाध्यक्ष अकिल कुरैशी, खंडाळयाचे उपसरपंच मोबीन शेख, वडजीचे सरपंच हाकिम शेख, म्हस्कीचे सरपंच ताहेर शेख, उपसरपंच शफिक शेख, सलीम शेख, जावेद सय्यद, निजाम सय्यद शाहनूर शेख आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले की, हाजी अकिल शेख यांना विकास कामे असो की लोकहिताची कामे असो मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. तसेच सर्वांचे पक्षात स्वागत करून पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना चांगली वागणूक योग्य मानसन्मान दिला जाईल असे आश्वासित केले. दरम्यान हाजी अकिल शेख यांच्या प्रवेशाने वैजापूर तालुक्यात अजित पवार गटात अल्पसंख्याक समाजातला मोठा नेता मिळाला आहे.
Social Plugin