Social News : राजपूत समाजाचे जेष्ठ समाजसेवक धोंडीरामसिंह राजपुत यांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राजपूत (भा.) प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला गौरव

वैजापूर



महाराष्ट्र शासनाने समाजसेवेबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण व पदमश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हे दोन पुरस्कार देऊन सन्मानित केलेले वैजापुरचे जेष्ठ साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांचा संभाजीनगर येथे राजपूत (भा.) सामाजिक प्रतिष्ठाणच्यावतीने विशेष सत्कार व गौरव करण्यात आला. मराठवाडा विभागाचे अप्पर विभागीय आयुक्त खुशालसिंह राजपूत(गोलवाळ) यांच्या हस्ते रविवार(ता.१३)रोजी विशेष समारंभात हा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मराठवाडा विभाग आयुक्त जिंतेंद्रजी पापळकर यांची विशेष उपस्थिती होती. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तोताराम बहुरे, डॉ.भगवानसिंग डोभाळ वैजापूर पालिकेचे प्रशासक भागवत बिघोत, बहुरे उद्योग समूहाचे रामसिंह बहुरे, विजयसिंह बहुरे,सुभाष महेर यांची यावेळी उपस्थिती होती.