श्री स्वामी समर्थ केंद्रासह विविध विद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन
वैजापूर
गुरूपौर्णिमे निमित्त (व्यास पोर्णिमा) शहरात श्री स्वामी समर्थ केंद्रात, पालिकेच्या पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात व विविध शाळेत गुरुवार (ता.१०) रोजी
विविध कार्यक्रम पार पडले.
येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात या निमित्त गुरूचरित्र पारायण,आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले. स्वामी भक्त मोनिका गंडे यांनी गुरुचरित्र पारायण वाचन केले. सुमनबाई आलूले यांनी त्यांना सहकार्य केले. १५३ भाविकांनी पारायण व महाआरतीत सहभाग घेतला. माजी नगरसेवक लिमेश वाणी, सी.के.पवार,गुलाबराब पवार, रावसाहेब निखाडे, उषा निखाडे,कार्तिक वाणी यांनी यावेळी आपला सहभाग नोंदविला.
याशिवाय पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात मुख्याध्यापिका नीता पाटील यांच्या उपस्थितीत शाळेतील शिक्षकांनी माजी शिक्षणाधिकारी तथा जेष्ठ समाजसेवक धोंडिरामसिंह राजपूत यांचे पूजन करून "एक पेड माँ के नाम" अंतर्गत शालेय परिसरात २८ रोपटयांचे रोपण करण्यात आले. दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना देखील परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले.या प्रसंगी मुख्याध्यापिका नीता पाटील यांच्या समवेत पर्यवेक्षक बी.बी.जाधव, सुभाष गोमलाडू,लता सुखासे,सुनीता वसावे,लता होलप, तगरे, पंकजा भाकरे यांची उपस्थिती होती.
Social Plugin