Crime News : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी


शिऊर-बंगला रस्त्यावर मध्यरात्री अपघात.

वैजापूर 

तालुक्यातील शिऊर ते बंगला रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या  धडकेत तरुण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना.  १० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. 
गणेश बाबुराव सोनवणे (वय २९)  घटनेतील मृताचे नाव असून बाबुराव दामू सोनवणे (दोघे रा.शिऊर) असे जखमीचे नाव आहे.



याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सोनवणे हा शुक्रवारी पहाटे त्यांच्या वडीलांसोबत दुचाकीने घराकडे जात होते. दरम्यान शिऊर ते बंगला रस्त्यालगत असलेल्या शिवपुरी मंगल कार्यालयासमोर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत गणेश गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ वैजापूर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात हलवण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.
या अपघातात गणेशचे वडील बाबुराव सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाला.  गणेश यांच्या  पश्चात आई, वडील,दोन भाऊ,भावजया असा परीवार आहे.त्याच्या पार्थिवावर दूपारी तीन वाजता संत बहिणाबाई मंदीरा शेजारील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
घटनेचा अधिक तपास हवालदार किशोर आघाडे तपास करीत आहेत.