वैजापूर मर्चंट-कॉ-ऑप् बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांची पत्रकार परिषद
वैजापूर
बँकेची बदनामी ही खोडसाळपणाने करण्यात येत आहे. जो कोणी ही बदनामी करत असेल त्याला वेळ आल्यावर कायदेशीर उत्तर देखील देऊ अशी माहिती वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब (रविंद्र) संचेती यांनी शुक्रवारी (ता.११) एका पत्रकारपरिषदेत दिली. या दरम्यान त्यांनी बँकेचा वार्षिक ताळेबंदही वाचून दाखविला.
जून महिन्यात बँकेचे लेखापरिक्षण.....
वर्षभरात होणाऱ्या शासकीय त्रैमासिक लेखापरिक्षण (Audit) हे जून महिन्यातच झाले असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान लेखापरिक्षण व त्या संबंधीच्या बाबी या एक कायदेशीर व निरंतर चालणाऱ्या बाबी आहेत. मात्र कुणी जर या बाबींचे भांडवल करून खोडसाळपणाने बँकेची बदनामी करत असेल तर वेळ आल्यावर त्यांना नक्कीच कायदेशीर उत्तर देणार असल्याचे संचेती यांनी यावेळी स्पष्ट केले.
२४० तरुण बँकेत नोकरीला..
पत्रकार परिषदेत बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी कुणाचेही नाव न घेता 'लोकांनी बाजार समिती हातात असताना स्वतःची मुलं तिथं कामाला लावली.' असे सांगत मात्र आम्ही कुठलीही लालसा न ठेवता 'मर्चंट कॉ-ऑप्' बँकेसारख्या मोठ्या संस्थेत सर्व घटकातील २४० तरुण नोकरीला लावले. त्यामुळे बँकेचे खातेदार असो अथवा ठेवीदार त्यांचा संचालक मंडळावर पूर्णपणे विश्वास असल्याचे सांगितले.


Social Plugin