Liquor Rate Hike : दारू झाली महाग : मद्य व्यावसायिकांचा लाक्षणीक बंद

मद्य व्यावसायिकांचा लाक्षणीक बंद

वैजापूर 
शासनाने मद्याच्या दरात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील मद्य विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी सोमवारी एक दिवसीय लाक्षणीक बंद पाळला.त्यामुळे मद्यपींची गैरसोय झाली.



राज्य शासनाने मद्यावरिल व्हॅट ५ टक्के वरून १० टक्के केला.परवाना शुल्कामध्ये १५ टक्के वाढ केली.तसेच देशी व विदेशी मद्य उत्पादन शुल्कात ६० टक्के वाढ केली.ही वाढ जाचक , त्रासदायक व अन्याय कारक आहे. याशिवाय अनेक हाॅटेल मध्ये बेकायदेशीर रित्या दारू विकली जाते.तसेच दारू पिऊन दिली जाते.तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मद्याचे सेवन केले जाते.या लोकांवर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी दारू व्यवसायीकांनी केली.या प्रकरणी इंडीयन हाॅटेल ॲन्ड रेस्टॉरंट असोसिएशन च्या वतीने उपजिल्हाधिकारी डॉ अरूण जऱ्हाड यांना निवेदन देण्यात आले.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गणेश राजपूत, उपाध्यक्ष संजय खानचंदाणी , सचिव अशोक बनकर, विशाल पवार, प्रकाश चव्हाण, कैलास लांडे, सम्राट राजपूत, मनोज राजपूत आदींची उपस्थिती होती.