Crime News - गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणारा तरुण वैजापुर पोलिसांच्या ताब्यात

तरुणाकडून पोलिसांनी जप्त केले कट्टयासह जिवंत काडतुस

वैजापूर
शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या वैजापूर-कोपरगाव रस्त्यालगत वैजापूर पोलिसांनी एकाला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. ०९ जुलै रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. शुभम अनिल बाहेती  (२५, रा. मुळेगल्ली, वैजापुर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.



   याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, वैजापूर-कोपरगाव रोडवर  एकजण हॉटेलमध्ये कंबरेला गावठी कट्टा लावून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकांने हॉटेल परिसरात सापळा लावला असता 'तो' इसम हॉटेलच्या बाहेर येताना मिळून आला. यावेळी त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम अनिल बाहेती  (२५, रा. मुळेगल्ली वैजापूर) असे सांगितले यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक काळया रंगाचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस (राऊंड) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळून आले. पोलिसांनी त्याच्या कडून गावठी कट्टा व काडतुस जप्त करून त्याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करत आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस अंमलदार किरण गोरे, योगेश झाल्टे, कुलदीप नरवडे, अविनाश भास्कर, प्रशांत गिते, अजित नाचन यांच्या पथकाने केली.