वैजापूर 

राज्यात सुरू असलेल्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी  तालुक्यातील नागमठाण येथे पार पडली. कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प  यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आनंद गंजेवार व तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तालुक्यातील ३० गावांमध्ये सदरील तंत्रज्ञान मोहिमा सुरू आहेत. यामध्ये डिजीटल शेती शाळा, रुंद सरी, वरंबा लागवड पद्धत, टोकन पद्धत, शून्य मशागत तंत्रज्ञान, आंतरपीक पद्धती यांचा समावेश आहे. नागमठाण येथे मंडळ कृषी अधिकारी माधव गांगुर्डे यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत व उत्पादनक्षम शेतीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, बीज प्रक्रिया, बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी, आंतरपीक पद्धती, चिकट सापळ्यांचा वापर तसेच प्रक्रिया उद्योगातून शेतीला पाठबळ कसे देता येईल याबाबत सविस्तर  मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागात तरुण उद्योजक निर्माण करण्यावरही विशेष भर देण्यात आला.या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळून उत्पादनवाढीस निश्चितच मदत होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. महालगाव कृषी मंडळातील कवुटगाव, टेंभी, डाग पिंपळगाव, अव्वलागाव, चांदेगाव येथे सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली महाले, मोनाली डोईफोडे, विद्या पालवे, मीना पंडित, यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिक करून दाखविले. या वेळी गणेश तांबे, महेश तांबे, गोकुळ विखे, राजेंद्र खुरुद, वैभव सावंत, पंढरी चव्हाण, आप्पासाहेब तांबे, शांताराम तांबे, वाल्मीक गिरी, बबन गिरी, कृष्णा तांभेरे, गणेश बहुले, अक्षय कर्डक, नवनाथ गाडेकर, संजय तांबे  गोकुळ तागड  सोमनाथ तांबे  गणेश गायके, ज्ञानेश्वर मते, विकास तांबे, स्वप्नील तांबे, यांच्याशेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.