शहरातील पुरणगाव रोड परिसरात हातात तलवारी घेऊन फिरत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला वैजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई ता.२९ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी अरविंद पिता जीतराम कुमार रा.खानवस्ती, श्रीनगर, सोनिपत राज्य : हरियाणा) याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, अंमलदार अमोल कांबळे, अविनाश डहाळे हे बुधवारी रात्री शहरात पेट्रोलिंग करत होते. या वेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुरणगाव रोडवरील धरम काटा परिसरात एकजण दोन्ही हातात तलवारी घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. सदरील माहितीची खातरजमा करत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. या वेळी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. पथकाने त्याच्या हातातील दोन्ही तलवारी जप्त केल्या. चौकशी दरम्यान त्याने त्याचे नाव अरविंद पिता जीतराम कुमार (रा. खानवस्ती, श्रीनगर, सोनिपत, राज्य : हरियाणा) असे असल्याचे सांगितले. या वेळी पोलिसांनी त्याच्या कडून दोन धारदार तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी संशयिताविरुद्ध शस्त्र अधिनियम कलमान्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सररची कारवाई पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.



Social Plugin